सातेगाव फाट्यावर उभ्या दुचाकीला धडक,दोन युवक जखमी
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव फाट्यावर शनिवार दिनांक १३ मे च्या सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोन दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार गौरव दिनकर काळमेघ वय २५ वर्ष रा.चौसाळा हा युवक एम एच २७ डी एफ ४७०८ ने सातेगाव येथून येत असताना फाट्यावर चिंचोना येथील रंदेश भोसले हा युवक एम एच २७ डी एम २३३६ ही दुचाकी घेवून उभा असताना फाट्यावर बस उभी असल्यामुळे सातेगाव येथून येणाऱ्या युवकाला फाट्यावर उभी दुचाकी दिसली नसल्याने गौरव काळमेघ याने उभ्या दुचाकीला धडक दिली त्यामध्ये गौरव काळमेघ व रंदेश भोसले हे दोन्हीं युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णसेवक शुभम निमकाळे व टेटवार या दोघांनी ऑटो मध्ये टाकून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी भरती केले परंतु दोन्हीं युवकांना गंभीर मार असल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे हलविले, अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)