मुऱ्हा येथील बालसंस्कार शिबिरातील मुलांसोबत रमले डॉक्टर..

 

मुऱ्हा येथील बालसंस्कार शिबिरातील मुलांसोबत रमले डॉक्टर..
महेन्द्र भगत अंजनगावसुर्जी तालुका प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी येथे सर्वांगीण बाल संस्कार शिबिराचे आयोजन मंदिर प्रशासनाने ३० एप्रिल ते १४ मे या कार्यकाळात आयोजित करण्यात आले असून या शिबिरात सहभागी असलेल्या शिबिरार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता द्वारकामाई बहुउद्देशीय संस्था अंजनगाव सुर्जीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार दि.११ ला करण्यात आले होते.या आरोग्य शिबिराकरिता दोनशे ते अडीचशे शिबिरार्थीनी सहभाग घेतला असून या सर्व शिबिरार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करिता द्वारकामाई बहुउद्देशीय संस्थेने अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध डॉक्टरांची चमू या शिबिरात उपलब्ध केली होती. या डॉक्टरांच्या चमूने शिबिरातील मुलांचे आरोग्य तपासणी सोबतच शिबिरात सहभागी झालेल्या बालगोपालांसोबत रमून त्यांच्या कलागुणांना साथ देत प्रोत्साहित करून आपण डॉक्टर असल्याचे भान सुद्धा न राहता डॉक्टरांना कदाचित या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपले बालपणच तर आठवले नसेल ना असे उद्गार स्थानिकांनी काढले. यावेळी अंजनगाव सुर्जी येथील डॉ. मंगेश राऊत, डॉ कौस्तुभ पाटील, डॉ वैभव भुस्कट यांनी वैद्यकीय तपासणी केली तसेच आरोग्य शिबिराच्या आयोजनाकरिता द्वारकामाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव खारोडे, उपाध्यक्ष जयेश सैतवाल यांनी परिश्रम घेतले यावेळी ह.भ. प. अतुल बोर्ड महाराज, ह. भ. प. परमेश्वर दहिकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love
[democracy id="1"]