कोकर्डा गाव महादेवपुरी रथयात्रेच्या भजनांनी दुमदुमले

कोकर्डा गाव महादेवपुरी रथयात्रेच्या भजनांनी दुमदुमले

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

कोकर्डा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकर्डा नगरी मध्ये रात्रभर रथयात्रा द्वारे भक्ती भावाने न्हावून निघाली, संपूर्ण गावामध्ये रांगोळ्यांची सजावट, नारळांनी सजलेला रथ, बॅण्डचा निनाद, वाजंत्रीचे सुर, पांचजन्याचा धीरगंभीर स्वर आणि महादेवपुरी महाराजांच्या जयघोषात रथोत्सव सोहळा मोठया उत्साहात आणि दिमाखात नजीकच्या कोकर्डा येथे संपन्न झाला, हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. महादेवपुरी महाराज रथ सोहळा हे कोकर्डा नगरीचे वैभव आहे. ग्रामवासीय रथोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. रात्री १० वाजता रथ मंदिरासमोरून हलला, सर्वात पुढे बॅण्ड पथक, त्यामागे ढोल ताशाचे वाजंत्री पथक, त्यामागे नारळांनी व आकर्षक विद्युत रोषणाईंनी केलेला रथ, त्यामागे ग्रामस्थ, भाविक अशी भव्य शोभायात्रा महादेवपुरी मंदिरातून ठिक १० ला रथयात्रा निघाली, भाविकांचे हस्ते रथाची पुजा करण्यात आली, तर अनेक भक्तांनी ठिकठिकाणी निंबू शरबत, पाणी, चहा, भात वाटप करून सेवा बजावली. कलाकाराच्या हस्ते संपूर्ण रथमार्गावर भव्य व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सायंकाळच्या वेळी आकर्षक रोषणाईमुळे रथाचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. भाविकांच्या गर्दीने महादेवपुरी महाराज मंदिर तुडूंब भरले होते. रोज सकाळी सात वाजता नित्यनेमाप्रमाणे पोहोचला असता मंदिरात हा सोहळा बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीची रथ परंपरा यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली मात्र या संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर विनायकराव इंगळे यांचे आठवण झाल्याशिवाय राहिली नाही असे मत डॉक्टर शिरीष कुमार इंगळे यांनी व्यक्त केले

Spread the love
[democracy id="1"]