शेतकऱ्यांना खरीप पुर्व नियोजनासाठी कृषि विभागाचे डोर टू डोर अभियान सुरू

शेतकऱ्यांना खरीप पुर्व नियोजनासाठी कृषि विभागाचे डोर टू डोर अभियान सुरू

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
तालुका प्रतिनिधी:

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे, यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्तरावर कृषि विभागाच्या वतीने काटेकोर पणे नियोजन करण्यांत येत आहे,बियाणे हा घटक शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे,संत वचन “शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी”असे वाचतो,त्यासाठीच प्रथम शेतातील माती तपासणे गरजेचे आहे,गेल्या हंगामात सोयाबीन पिकावर आलेला खोडकीडा,असो की तुर पिकातील फुजारिअम बुरशीमुळे मर,कापुस पिकातील बोंड अळी यांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे,तृणधान्येचे आहारातील महत्त्व पाहता तृणधान्ये पिकाखालील क्षेत्रात वाढ,घरच्या घरी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी,बिजप्रक्रिया या बदल मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी कृषि सहाय्यक मारोती जाधव हे शेतकरी बांधवांना घरी जाऊन माहिती देत आहेत,मागील चार-पाच वर्षापासून असे खरीप पुर्व अभियान राबवित असल्यामुळे,एक प्रकारची लोकचळवळ निर्माण झाली आहे,गावातच शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होवून दरवर्षी ९० ते ९५ लाख निव्वळ बियाण्यावर होणारा खर्च वाचविण्यात मोठे यश मिळाले आहे,कापुसतळणी हे गाव बियाणे जतन व वापरामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आले आहे,कृषी विभागाने खरीप पुर्व राबविलेल्या डोअर टू डोअर उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी समुह सहाय्यक सुमेध वाहूळे,सरपंच कु.अक्षदा खडसे,कृषिताई,कृषिमित्र व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]