शिराळा येथील बुध्दविहारात बुध्द जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
तिसदा कृउबास संचालक पदी निवडुन आलेले मिंलिंदभाऊ तायडे डॉ जुनेद खान पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. – शिराळा : येथील बुध्दविहारात विविध कार्यक्रमांनी बुध्द जयंती साजरी करण्यात आली. दुपारी पाच वाजता पंचशील ध्वजारोहण कृउबास संचालक मिंलिंदभाऊ तायडे व पत्रकार डी आर वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले.बुद्धवंदना विशाल तायडे यांनी सामुदायिक घेतली.तद्नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार मिंलिंदभाऊ तायडे यांनी अर्पण केला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृउबास संचालक मिंलिंदभाऊ तायडे नंदकुमार चिंचखेडे डॉ जुनेद खान अशोकराव सिरसाठ, डॉ अवधूत शेंन्डे, पत्रकार डी आर वानखडे खाज्यामिया देवराव मेश्राम सुनिता सुखदान शकुंतलाबाई तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिंलिंदभाऊ तायडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रविण वानखडे यांनी सत्कार केला तर डॉ जुनेद खान यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कपिल तायडे यांनी केला पत्रकार डी आर वानखडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दिनेश तायडे यांनी सत्कार केला. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांच्या विचारांवर चालण्याची काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते भगवान बुद्ध यांच्या पुतळ्या पर्यंत बुध्दम शरणम् गच्छामी या गजरात विशाल मेनबत्ती रॅली काढण्यात आली. बोर्डी येथील कलाकारांचा भिमगिताचा कार्यक्रम रात्री आठ वाजता सादर करण्यात आला. यावेळी मोलाचे सहकार्य युवक आक्रमक भिमशक्ती मंडळ शिराळा चे युवक विनय तायडे कपिल तायडे सुमित वानखडे अजय तायडे, मंगेश मोहोड प्रविण वानखडे विशाल तायडे अमित वानखडे, यश तायडे सुरज वानखडे, विक्की मोहोड, सम्यक गवई रितेश सुखदान प्रज्वल मोहोड प्रणय तायडे संजय तायडे , सतिश सिरसाठ संगम इंगळे, भुषण तायडे शुभम गांवडे, कार्तिक वाकोडेआदींनी परिश्रम घेतले यावेळी दिनेश तायडे अवधूत तायडे साहेबराव भटकर गुणवंत तायडे अमोल तायडे सागर मोहोड उपासिका रेखाताई मोहोड सुर्यकांत वानखडे मंदाताई वानखडे सुशिला तेलमोरे वनमाला वानखडे मंदाताई भटकर शिलाबाई तायडे सुनिता तायडे सुमित्रा तायडे मंगला वाकोडे चंद्रभागा इंगळे आदी उपस्थित होते सुत्रसंचलन विशाल तायडे तर आभार विक्की मोहोड यांनी केले
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)