हिवरखेड येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चे नवीन वास्तूचे भूमिपूजन संपन्न
हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चे नवीन वास्तूचे निर्माण करण्याचे भूमिपूजन भोपळे संकुल येथे संपन्न झाले.कार्यक्रमाला राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुमन दीदी अकोला, ब्रह्माकुमारी लीना दीदी प्रभादिदी पातुर सेवाकेंद्र ब्रह्माकुमारी जयादीदी तसेच उमा दीदी अकोट सेवाकेंद्र ह्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल भाऊ भोपळे संतोष रहाटे सौ तेजस्विनी संतोष रहाटे शोएबअली मिरसाहेब श्यामशील भोपळे प्रकाश भाऊ खोब्रागडे नंदकिशोर निमकर्डे उपसरपंच बेलखेड सुनील इंगळे रमेश गुप्ता विनय राठी विनोद भोपळे शांताराम कवळकार गणेश खारोडे,क्ष्मण हिवराळे मधुकर पोके प्रशांत ढोकणे मिर्झा डॉ.उगले पत्रकार राहूल गिऱ्हे गोवर्धन गावंडे रितेश टिलावत
जितेंद्र लखोटीया अर्जुन खिरोडकर अनिल कवळकार गजानन दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
वर्तमान परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात मन: शांतीसाठी नैतिक मूल्यांच्या रुजवणुकीसाठी तसेच जोपासणीसाठी अशा सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ठिकाणांची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. या उत्तुंग भावनेतून ह्या कार्याची संकल्पना उदयाला आली आहे असे मत अकोल्यावरून आलेल्या ब्रह्माकुमारी सुमन दीदी यांनी व्यक्त केले. तसेच हे ईश्वरीय कार्य आहे या भूमीवर बनणारे भवन हे जनमानसाच्या कल्याणार्थ असणार आहे. कुठलाही भेदभाव नसून सर्वांसाठी हे स्थान खुले असणार आहे, तरी या महान कार्याला आपापल्या परीने सर्वांनी सहयोग करावा असे आवाहन पातुर सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी लीना दीदी यांनी केले .हिवरखेड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी वैशाली दीदी यांनी उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.संस्थेचा परिचय प्रभा दीदी यांनी दिला तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण भड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा येलुकार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशासाठीचंद्रप्रकाश जीभो पळेश्या म भाई नटवरलालजी तापडिया कैलास भाई इखार,वासुदेव भाई येलुकार भारत बोबडे सुभाष राऊत मोहन वानखडे दिनेश राऊतश्रीकृष्ण इखार राहुल वरटकार यांनी विशेष परिश्रम घेतले.ब्रह्मपुषणाचे आयोजन श्री प्रशांत ढोकणे यांच्याकडून करण्यात आले होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)