अमरावती – महाराष्ट्र अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान कांदा पिकाला सर्वाधिक फटका

 

ब्युरो रिपोर्ट अमरावती विक्रम ढोके

पाऊस वादळी वाऱ्यामुळे गेल्या सहा दिवसात झालेल्या नुकसानीचा मोठा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पाऊस, आणि वादळी वाऱ्यामुळे गेल्या सहा दिवसात झालेल्या नुकसानीने रब्बी हंगामातील पिकं पार मातीला मिळाले आहे. अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. अचलपुर, अंजनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा,गहु पिकाला बसला आहे. कित्येक हेक्टवरील कांदा, गहु भाजीपाला भुईसपाट झाला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडला आहे. पाणी पडल्याने कांद्याची टिकवण्याची क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याखालोखाल, भाजीपाला, केळी आणि आंबा फळाला फटका बसला आहे. पावसाचा इशारा कायम असल्याने बळीराजासमोरील चिंतेचे ढग कायम आहेत. शासनाकडुन अद्यापही पंचनामे सध्या सुरु झाले नसून प्रत्यक्षात मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.अंजनगाव तालुक्याला पावसाने झोडपलं अनेक भागांत अवकाळी पावसाने कहर केला असून तालुक्यात धुमाकूळ घातला. तालुक्यातील पांढरी खानमपुर गावातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा कांदा काढुन ठेवलेला असताना पाऊस आल्याने अनेक शेतातील कांदा सडला. नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने व जनप्रतिनिधी अद्याप नुकसानग्रस्त भागांत आले नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]