भारतीय सेनेमधुन सेवानिवृत्तीनंतर जन्मभुमित परतलेल्या सैनिकाचे केले वाजत गाजत स्वागत

सैनिक संजय भगत यांनी केले १७ वर्ष भारत मातेचे रक्षण; श्री सतिआई नगरीत जल्लोष स्वागतपवन राठी मंगरूळपीर ता. प्र. दि. ०२ शेलुबाजार येथून जवळ असलेल्या लाठी येथील सैनिक संजय गोवर्धन भगत हे भारत मातेचे १७ वर्षे रक्षण करून आज आपल्या जन्मगावी परत आले. त्यांचे मोठ्या जल्लोषात श्री सतीआई नगरीमध्ये स्वागत करण्यात आले. सैनिक संजय गोवर्धन भगत यांनी आपल्या वयाची १७ वर्ष भारत मातेचे रक्षण करून, देशसेवा करून सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन आज आपल्या जन्मगावी लाठी येथे परत आले. शेलुबाजार येथील मुख्य चौकामध्ये वाजत गाजत ढोल ताशाच्या आवाजात तसेच देशभक्तीपर गीताच्या तालावर सैनिक संजय गोवर्धन भगत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संजय भगत यांनी बिनागुडी, पश्चिम बंगाल, सियाचीन ग्लासियर, लेह-लडाक,51 RR, (जम्मू अँड काश्मीर), नवी दिल्ली, कोकरा झर, आसाम, बीकानेर राजस्थान, अवेरी पत्ती हिमाचल प्रदेश ग्वालियर, मध्येप्रदेश, मनेसर NSG कॅम्प अशा विविध ठिकाणी आपली १७ वर्षाची सेवा भारतीय सेनेत दिलेली आहे, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांची पोस्टिंग झाली व त्या ठिकाणी देखील त्यांनी चोखपणे आपले कार्य पार पाडले.श्री सतिआई नगरीमध्ये आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत, पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी सेवानिवृत्त सैनिक संजय भगत यांनी युवकांनी सैन्यदलात भरती व्हावे व देश सेवा करावी, काही अडचण आल्यास मला हाक द्यावी मी कधीही धावून येईल असे आव्हान केले. यावेळी सैनिक संजय गोवर्धन भगत यांच्या मिरवणुकीमध्ये परिसरातील सर्व देशभक्त सहभागी झाले होते.बॉक्स तालुक्यातील शेलुबाजार येथील मेन चौकात माजी सैनिकाकडून स्वागत करण्यात आले. त्यांनतर वाजत गाजत लाठी गावामध्ये नेण्यात आले. लाठी गावात सैनिकाची जिप्सी मधून व घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी गावामध्ये रांगोळी काढून, सैनिकाच्या अंगावर फुलाचा वर्षाव करून, आरती ओवाळून, औक्षण करण्यात आले. तसेच यावेळेस शाल श्रीफळ देऊन शेलुबाजार येथील कर्णावट या व्यावसायिकाकडून सैनिकाचे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली.

Spread the love
[democracy id="1"]