भाविकांच्या बैठक व्यवस्थेसह शेकडो,कुलर्स ,एल ई डी स्क्रीन सह संपूर्ण नियोजन नियोजनबद्ध सुरू लाखों लोकांची राहणार उपस्थिती अकोला –जिल्ह्यातील म्हैसपूर येथे 5 मे पासून 11 मे पर्यंत पंडित प्रदीप महाराज मिश्रा आणि बाल कथा व्यास पं श्रीकृष्णाजी दुबे यांची श्री स्वामी समर्थ शिवमहापुराण कथा होत आहे या कार्यक्रमांच्या अनुषंगाने रुपेश (बंटी) चौरसिया व विजय जगदीशप्रसाद दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली 200 एकर परिसरात ४० एकर जागेत भाविकांच्या सेवेसाठी मुख्य मंडप उभारणी करण्यात आली आहे. सोबतच येणाऱ्या लाखों भाविकांसाठी भोजन आणि पाणी ,शौचालय, आणि सुरक्षा तसेच उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता शेकडो कुलर लावून बारकाईने लक्ष घालून व्यवस्था करण्यात येत आहे पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या या महाकथेसाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत ची वेळ निश्चित करण्यात आली असून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी बालकथाकार पं श्रीकृष्णजी दुबे यांच्या वाणीतून कथा प्रारंभ होणार असून ही कथा संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालणार आहे देशभरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करत असतांना त्या महाकथेला वेगवेगळी नांवे दिली जाते त्यानुसार अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथील आयोजित महाकथेला पं प्रदीप मिश्रा यांनी श्री स्वामी समर्थ महापुराण कथा असे नांव दिले आहे कथा श्रवण आणि दर्शनासाठी येणाऱ्या लाखों भाविकांच्या जेवणाची व्यवस्था सकाळी 10 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळीच अखंडित सुरू राहणार आहे तर 20 लाख लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी सुमारे शेकडो सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. कथा श्रवणस्थळी भाविकांसाठी एलईडी स्क्रीन व्यवस्था करण्यात आली आहे . यासोबतच घटनास्थळी डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकासह 5 रुग्णवाहिका अखंडित तैनात असतील. धार्मिक, उपासना साहित्य, अयोध्या, सहित मथुरेतील मिठाई, खाद्यपदार्थ इत्यादींची दुकानेही तिथे भाविकांच्या खरेदीसाठी शेकडो दुकाने उपलब्ध असतील. महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी 100 महिला बाऊन्सर असतील. तर सेवेसाठी 10 हजार सेवेकरी सेवा देत आहेत राज्य व शेजारील राज्यातून येणाऱ्या भाविकांची 2 ठिकाणी स्वतंत्र प्रत्येकी 50 एकर जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे अकोला कडून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र आणि वाशिम कडून येणाऱ्या वाहनांसाठी वाशिम बाजूला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांनी कथाकथनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुपेश (बंटी) चौरसिया व विजय जगदीशप्रसाद दुबे ,श्री राधे कृष्ण सेवा समिती, म्हैसपूर अकोला, अर्जुन समाज बहुउद्देशीय व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह यासाठी विविध समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही प्रयत्नशील आहेत. महानगरातील विविध मंदिरांचे पुजारी,आणि विश्वस्त ,पदाधिकारी यामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे पं प्रदीप महाराज मिश्रा व बालकथाकार पं श्रीकृष्णजी दुबे यांच्या वाणीतून कथा श्रवण आणि कथा महापुराण यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)