बाळापुर निवडणुक विभागाचा अजब गजब कारभार. वाडेगाव चे नागरीक याबाबत अनभिज्ञ प्रतिनिधी, बाळासाहेब नेरकर

वाडेगाव ग्रा पं भाग क्र ४ चे सर्वसाधारण महिला सदस्य हे अपात्र झाल्याने त्या जागी पोट निवडणुक घेण्याकरीता निवडणुक आयोगाकडुन सर्वसाधारण महिला या जागेसाठी निवडणुक घेण्याचा कार्यकम जाहीर करण्यात आला. त्या जागे करीता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची तारीख दि २५ एप्रिल २०२३ ते ०२ में २०२३ पर्यंत सकाळी ११ वाजता ते ३ वाजेपर्यंत निर्धारीत करण्यात आली होती. त्यानुसार आज दि.२ में २०२३ रोजी वाडेगाव ग्रा पं ला ४.५५ मिनिटांनी वाडेगाव चे कोतवाल यांनी अनुसुचित जातीतील खुला वर्गाची निवडणुकीची नोटीस ग्रा पं च्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली. मात्र ही नोटीस दि २८ एप्रिल रोजीच लावायला पाहिजे होती तसे न करता अंतीम तारखेची वेळ निघुन गेल्या नंतर नोटीस बोर्डावर लावण्यात आल्याने गावकऱ्यांनी ग्रा पं वर गोंधळ केला असता गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मो अफतार यांनी आपण बाळापुर निवडणुक विभागात चौकशी करू असे सांगुन गावकऱ्यांना शांत केले. त्यानंतर या प्रकरणाबाबत जाब विचारणा करीता बाळापूर निवडणुक विभागात गेले असता उडवा उडवीचे उत्तर दे०यात आली.समंधीत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या या प्रकरणातील या कृत्या बाबत जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून गावकऱ्यांना ज्ञाय देण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Spread the love
[democracy id="1"]