अंजनगाव सुर्जी बाजार समिती निवडणुकीत सहकार पॅनल चे वर्चस्व अत्यंत चुरशीच्या लढतीत अमर शिंगणे ईश्वर चिठ्ठी पर्यायाने विजयी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत सहकार पॅनल ने बाजी मारत बाजार समितीत वर्चस्व प्रस्थापित करीत एक हाती सत्ता मिळवली असुन 15 उमेदवारांन पैकी 14 उमेदवार निवडून आले. 1 हजार 452 मतदारांपैकी 1 हजार 434 मतदारांनी 18 संचालक पदाच्या उमेदवारी करिता मतदानाचा हक्क बजावला.
काल दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली ते थेट 4 वाजेपर्यंत नंतर सायंकाळी 5 वाजता अत्यंत चुरशीच्या लढतीत मतमोजणीला सुरुवात झाली मोजणी सुरू झाल्यावर प्रथम मोजणी झालेल्या व्यापारी अडते मतदारसंघातून शंकरराव चौरे 31 तर चंद्रशेखर शेळके 35 मते घेऊन विजयी झालेत. हमाल मापारी मतदार संघातील शेख जमील शेख रहेमान 91 मते घेऊन विजयी, ग्रामपंचायत मतदारसंघातून सहकार पॅनल चे प्रदीप इंगळे 170 मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघातून परिवर्तन पॅनल चे एकच उमेदवार रवी उपाध्ये 155 मते घेऊन विजयी झाले. सर्वसाधारण मतदार संघातून सहकारा पॅनल चे अमर शिंगणे 148 , अनंता रोकडे 148 मते घेऊन विजयी झाले.सोसायटी मतदारसंघ इतर मागासवर्ग मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुरेश आडे यांना 336 मते मिळवत विजयी झाले तर भटक्या विमुक्त मतदार संघातून सहकारचे विशाल पंडीत 341 मते मिळवून
विजयी झालेत.महिला मतदारसंघातील सहकारच्या शारदा ढोक यांना
350 मते व पूनम पोटे यांना 336 मते मिळवून विजयी झाल्या. सर्वसाधारण मतदारसंघातून सहकाराचे जयंत साबळे 364, सुरेश राऊत 319, अविनाश सदार 327, विजय कळमकर 308, विकास येवले 331, संजय काळमेघ 321, सागर घोगरे 329 मते मिळुन विजयी घोषित करण्यात आले.
तसेच नितिन पटेल 148, विनोद घोगरे 148, अमर शिंगणे 148 यांना सारखेच मतदान झाल्याने सुरवातीला परिवर्तन पॅनल च्या उमेदवारांनी आक्षेप घेत पुन्हा मतमोजणी चा निवडणूक अधिकारी यांना अर्ज केला तर दुसऱ्यांदा सहकार पॅनल ने ही आक्षेप घेत पुन्हा मतमोजणी रात्री उशीरा पर्यंत करण्यात आली परंतु तिघांनाही सारखेच मतदान झाल्याने निवडणूक अधिकारी यांनी उमेदवारांना मान्य करत ईश्वर चिठ्ठी चा पर्याय निवडला व अखेर अमर शिंगणे ईश्वर चिठ्ठी पर्यायाने निवडूण आले या वेळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Spread the love
[democracy id="1"]