अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन परतवाडा येथील फिर्यादी नामे ओकांर साहेबराव पवार, रा. शिवाजी नगर, परतवाडा यांनी दि.२७/०४/२०२३ रोजी पोलीस स्टेशन ला येवून तक्रार दिली की, ते त्यांच्या कुटुंबीयांसह दि. २६/०४/२०२३ रोजी कामानिमित्त अमरावती येथे गेले असता रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने त्याच घराचा दरवाज्याचा कुलुप – कोंडा तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने (एकदानी, पोत, कानातील झुमके, अंगठी, नाकाची नथ.) किं.अं.१,६८,६००/- रू तसेच चांदीचे दागीने (हातातील कडे ३, बांगड्या-४ ब्रासलेट, कमरेचा आकडा, पेजन, कमरबंध ई.) कि. अं.३४,०९०/- रू असा एकूण २,०२,६९०/- रूचा चा मुद्देमाल चोरून नेला. प्राप्त तक्रारीच आधारे पो.स्टे. परतवाडा येथे घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला अश्या प्रकारच्या घरफोडीच्या घटनांना त्वरीत आळा बसण्याकरिता व घडलेल्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. यांनी परतवाडा पोलीसांना सूचना निगमीत केल्या होत्या.
दिनांक. २९/०४/२०२३ रोजी परतवाडा पोलीसांचे पथक गस्त करित असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्हा हा परसरातीलच सराईत गुन्हेगार आरोपी नामे रोशन किरण सरदार, वय २५, रा. परतवाडा यांने केला असून सद्या सदर आरोपी हा मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे तयारीत आहे. प्राप्त माहीतीची शहानिशा करून पथकाने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचुन शिताफीने त्यास अटक केले.
सदर आरोपीने वरील तक्रारदार यांचे घराचे कुलुप कोंडा तोडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे ताब्यातून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल (सोन्या व चांदीचे दागीने) किं.२,०२,६९०/- रूचे जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करित आहे.
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. अतुलकुमार नवगीरे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, अचलपुर यांचे मार्गदर्शनात संदीप चव्हाण ठाणेदार पोलीस स्टेशन परतवाडा यांचे नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस अमलदार सुधीर, मनीष काटोलकर, सावलकर, बाबील घनश्याम यांचे पथकाने केली.
ब्यूरो रिपोर्ट अमरावती विक्रम ढोके