सौ.सुलभाताई खोडके यांनी लावला मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा धडाका

देवी रेसिडेन्सी, शेगांव व शिवनेरी नगरात आले विकासाचे पर्व
पायाभुत सुविधांमधून नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास प्राधान्य- आ.सौ. सुलभाताई खोडके
अमरावती २७ एप्रिल : शहरीकरणाचा वाढता विस्तार लक्षात घेता,प्रत्येक प्रभागात पायाभूत सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे. याकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध करून आणण्यासह स्थानिकांना अभिप्रेत असलेला विकास कार्यक्रम राबविण्यावर आपला भर आहे. अंतर्गत रस्ते,पेयजल सुविधा उपलब्धता,परिसरातील उद्यानांची नियमितपणे देखभाल, स्वच्छ व सुंदर परिसराकरिता दैनंदिन साफसफाई, जनसामान्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.यासोबतच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पथदिवे उपलब्धता आदीसहित अन्य बाबी लक्षात घेता, पायाभुत सुविधांमधून नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले .
बुधवार दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी आमदार महोदयांनी विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाचा धडाकाच लावला सुलभाताई असून या शृंखलेत मूलभूत सोयी सुविधांच्या विकासकामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत रुपये २६.३६ लक्ष निधीतून निर्माण करण्यात आलेल्या देवी रेसिडेन्सी येथील साई सागर अपार्टमेंट समोरील प्रभाग क्रमांक-१ स्थित गल्ली क्रमांक १ ते ४ येथील रोडचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तदनंतर शेगाव स्थित मनपा शाळेच्या लगतच्या परिसरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रुपये १५ लक्ष निधीतून शेगाव येथिल अंतर्गत नालीचे बांधकाम करणे तसेच सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रुपये २० लक्ष निधीतून शेगाव येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे या विकासकामांच्या भूमीपूजनाची आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी औपचारिकता साधली. यासोबतच शिवनेरी नगर येथील मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत रुपये २५ लक्ष निधीतून शिवनेरी नगर सर्व्हे क्रमांक -१९८/१२३ मधील श्री .खिराळे यांच्या घरापासून ते दिलीप कडू यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे या विकासकामांचे आमदार महोदय यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यादरम्यान स्थानिक नागरिकांचे वतीने आमदार- सौ. सुलभाताई खोडके,यश खोडके यांचे स्वागत करण्यासह त्यांचा यथोचित सत्कार सुद्धा करण्यात आला. यावेळी विकासकामांच्या नामफलकाचे अनावरण करीत आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी नागरिकांना विकासकामांचे पूर्तता व उपलब्धतेला घेऊन दिलेला शब्द सार्थ ठरवीत क्लीन सिटी अँड ग्रीन सिटी करिता आता नागरी समस्यांचे निराकरण करीत हा मार्ग प्रशस्त करून दिल्याची प्रचिती नागरिकांना आल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

ब्यूरो रिपोर्ट विक्रम ढोके

Spread the love
[democracy id="1"]