कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नियोजन भवनात खरीपपूर्व आढावा बैठक

अमरावती विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शुक्रवारी (28 एप्रिल) सकाळी 11 वाजता होणार आहे.

जून महिन्यापासून सुरू होणा-या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी महसूल विभागनिहाय पूर्वतयारी बैठका आयोजित केल्या आहेत. त्यानुसार अमरावती येथील बैठक शुक्रवारी होईल.

विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व कृषी प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने बियाणे, खत, कीटकनाशके आदी उपलब्धता, आवश्यकता व विविध कृषी योजनांची अंमलबजावणी याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

कृषी मंत्री श्री. सत्तार यांचा दौरा पुढीलप्रमाणे : गुरूवारी (27 एप्रिल) सायंकाळी 7 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शुक्रवारी (28 एप्रिल) रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता अमरावती विभाग खरीपपूर्व आढावा बैठकीला उपस्थिती. बैठक संपल्यानंतर कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साधारणत: दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. दुपारी 3 वाजता अमरावतीहून शासकीय वाहनाने दर्यापूरमार्गे अकोल्याकडे प्रयाण.

Spread the love
[democracy id="1"]